नागपूर,
March 8, 2026 ''जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उधारी” या विचाराला साकार रूप देत महिला दिनानिमित्त ‘एक कदम अपनी ओर’ नारी स्वास्थ्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ८ मार्च रोजी सकाळी ६.३० ते ९ या वेळेत मेजर खरे गार्डन ( लेंडर पार्क)रामदासपेठ येथे हा विशेष मेळावा घेण्यात येणार आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडेही एक पाऊल टाकावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्व वयोगटातील महिलांसाठी हे शिबिर खुले असून सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करता येणार आहे.रामदास पेठ येथील इंद्रायणी हॉस्पिटलच्या प्रख्यात मधुमेहतज्ज्ञ डॉ. आरती धारसकर यांची ही संकल्पना असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध वैद्यकीय तपासण्या केल्या जाणार आहेत.March 8, 2026 यासोबतच वेदना तज्ज्ञ डॉ. अर्चना देशपांडे यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे महिलांना आपल्या आरोग्याविषयी सखोल माहिती व तज्ज्ञ सल्ला मिळणार आहे.विशेष म्हणजे, या मेळाव्यात केवळ आरोग्य तपासण्या नव्हे तर झुंबा, योग सत्रे आणि विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. आकर्षक बक्षिसांमुळे कार्यक्रमात उत्साह आणि सहभाग अधिक वाढणार आहे.महिलांनी आरोग्य, आनंद आणि आत्मविश्वासासाठी ‘एक कदम अपनी ओर’ टाकत या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.