हरियाणा आयडीएफसी बँक घोटाळातील मास्टरमाइंड अटकेत

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
चंदिगढ,
Mastermind in Haryana IDFC Bank scam हरियाण्यातील आयडीएफसी फर्स्ट बँक घोटाळा प्रकरणात दक्षता विभागाने मोठी कारवाई केली आहे. काल रात्री उशिरा पथकाने या प्रकरणात मास्टरमाइंड रिभव ऋषीसह चार जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रिभव ऋषी, अभय, स्वाती सिंगला आणि अभिषेक सिंगला यांचा समावेश आहे. घोटाळा बँकेच्या चंदीगड शाखेत घडला असून त्यामध्ये ५९० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
 

hdfc 
 
या फसवणुकीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती १४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमी झाली आहे. हरियाणा सरकारशी संबंधित संस्थांनी बँक खात्यांमध्ये जमा केलेली रक्कम आणि नोंदवलेली रक्कम यामध्ये तफावत असल्याची तक्रार केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. घोटाळा समोर आल्यावर आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शेअर्स सोमवारी २० टक्क्यांनी घसरले आणि खालच्या पातळीवर पोहोचले. कथित घोटाळा बँकेच्या संपूर्ण तिमाही उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.