मेळघाटात अरुंद रस्त्यामुळे पुन्हा अपघात

-जखमींना परतवाडा हलविले -धारणीचे प्रवाशी अडकले

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
धारणी, 
melghat-accident : अमरावती ते खंडवा जाणारी एसटी क्रमांक एमएच २० जीसी ३७८१ बस भवई फाट्याजवळ समोरील बोलेरो गाडीला भिडल्याने अपघात झाला. कमी रुंदीच्या रस्त्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज आहे. घाटात अपघात झाल्याने धारणी ते खंडवा जाणार्‍या अनेक प्रवाश्यांना अडचणींना तोंड द्यावे लागले.
 
 

J 
 
 
 
२५ फेब्रुवारी रोजी अमरावती ते खंडवा एसटी घाट वळणातून धारणीकडे येत असताना बोलेरो क्र. एमपी ०९ टीए-९५८६ ने आमने-सामने ठोस मारली. एसटीमध्ये ५० ते ५५ प्रवाशी होते. मात्र, सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. बसच्या समोरचा भाग क्षतीग्रस्त झाला. बोलेरोतील दोन जण जखमी झाले. दोघांवर परतवाडा शहरात प्रथमोपचार करण्यात आले. चिखलदरा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. घाट वळणात रस्त्याांची रुंदी सा. बां. विभागाने कमी ठेवल्याने प्रचंड अपघात होत आहेत. एसटीचे चालक समीर देशमुख व वाहक एस. के. उमप सुखरूप आहेत. इतर प्रवाशी पण थोडक्यात बचावले. धारणीपासून अपघातस्थळ ६२ कि. मी. अंतरावर असून अपघात सकाळी साडेदहा वाजता घडला. मेळघाटात खराब व अरुंद रस्ते आणखी किती अपघात घडवणार किंवा बळी घेणार याविषयी जनचर्चा सुरू आहे. सा. बां. विभागाने रस्त्यांकडे लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.