दोन मोटार सायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात

४ मोटार सायकल जप्त

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
वाशीम, 
motorcycle-thief-caught-by-police : जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या चार मोटार सायकलसह दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत सविस्तर असे की, स्थानिक गुन्हे शाखा, वाशीमच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, तालुयातील तोडगांव येथे मोटार सायकल चोरणारा इसम हा गावात आला आहे. त्यावरुन पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना तात्काळ सपोनि जगदिश बांगर यांचे सोबत एक पथक तयार करुन आरोपी शोध करीता तोंडगाव येथे रवाना केले.
 
 
 
gsdg
 
 
 
ग्राम तोंडगांव येथे पोलिस दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी गावातून पलायन करण्याच्या तयारीत असतांना स्थानिक गुन्हे शाखा च्या पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. सदर आरोपीचे नांव आदर्श जिवन कांबळे रा. तोंडगांव असून त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने पोलिस स्टेशन शिरपूर येथुन होन्डा कंपनीची युनिकॉन मोटार सायकल त्याचा साथीदार श्रेयस गणेश पाचपिल्ले रा. खामगांव जिन, वाशीम यांचे सोबत मिळुन चोरी केल्याचे सांगीतले. त्यावरुन श्रेयस गणेश पाचपिल्ले याचा वाशीम शहरात शोध घेतला असता तो काटा रोडने येत असल्याचे समजले. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेची एक टिम यांनी काटा रोडवर थांबुन आरोपी येताच त्याला ताब्यात घेतले. दोन्ही आरोपीतांना विचारपुस केली असता त्यांनी वाशीम जिल्ह्यातील ग्राम शिरपूर, रिठद व हिंगोली जिल्ह्यातील माळशेलु येथुन मोटार सायकल चोरी केल्याचे सांगीतले.
 
 
सदर कारवाई पोलिस अधीक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि जगदिश बांगर व पथकाने केली.