कुख्यात गुंड अजितची भंडारा कारागृहात रवानगी

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
वर्धा,
notorious-gangster-ajit : बोरगाव (मेघे) येथील कुख्यात गुंड अजित उर्फ तोतल्या राठोड (२७) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.
 
 

notorious-gangster-ajit 
 
 
 
अजित राठोड याच्यावर वर्धा शहर व सावंगी पोलिस ठाण्यात २५ गुन्हे नोंद आहेत. तो हद्दपार असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून शस्त्र बाळगून दहशत पसरविणे, गैरकायद्याची मंडळी जमवून जिवाने ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, गांजाचे सेवन करणे आदी गुन्हे करून दहशत पसरवित होता. परिणामी, नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांना पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यामार्फत सादर केला. याची दखल घेत त्याला स्थानबद्ध करण्याचा आदेश जारी करून त्याची भंडारा येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी आशिष महेशगौरी, संतोष ताले, वैशाली करमनकर, करिश्मा परचाके यांनी केली आहे.