१५ वर्षांहून जुनी ७ लाख वाहने शहरात प्रवेशबंदीच्या वाटेवर

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
पुणे
Pune old vehicle ban, वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषण शहराच्या रहिवाशांसाठी चिंता ठरली आहे. यावर उपाय शोधण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुमारे १५ वर्षांहून जुनी वाहनं शहराच्या मुख्य भागात प्रवेश नाकारण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे पाठवण्याची तयारी केली आहे. सध्या पुण्यात जवळपास ७ लाख जुनी दुचाकी आणि चारचाकी वाहने धावत आहेत, ज्यामुळे हवेतील प्रदूषण आणि रस्त्यावरील कोंडी अधिक वाढली आहे.
 

Pune old vehicle ban, Pune traffic congestion, 
जुन्या वाहनांचे इंजिन Pune old vehicle ban, कालबाह्य झाल्यामुळे ते अधिक धूर सोडतात, तसेच तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यात बंद पडल्यास मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर पुण्यातील रस्त्यावरून जुनी वाहने कमी होतील आणि शहराची वाहतूक आणि हवेची गुणवत्ता सुधारेल, असा विश्वास प्रशासनाला आहे.या निर्णयामुळे जुन्या वाहनधारकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे, पण तज्ज्ञांचे मत आहे की शहराच्या आरोग्यासाठी आणि वाहतूक सुटसुटीत होण्यासाठी अशा 'स्क्रॅपेज धोरणा'ची गरज आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर तसेच नवीन वाहन विक्रीवरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सर्वांचे लक्ष राज्य सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे.