'मीटर फास्ट' आरटीओची मोठी कारवाई

१७४ रिक्षाचालक दोषी

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
पुणे,
Pune RTO  प्रवाशांकडून मीटरनुसार भाडे न आकारणे, जादा प्रवासी घेणे, उद्धट वर्तन करणे तसेच ‘मीटर फास्ट’ ठेवणे यासारख्या नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पुणेने मोठी कारवाई केली आहे. जानेवारी २०२६ मध्ये राबविलेल्या विशेष मोहीमेत तब्बल ४७७ ऑटो रिक्षांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १७४ रिक्षाचालक नियमभंग करताना आढळले.
 

Pune RTO  
दोषी आढळलेल्या सहा रिक्षाचालकांचे परवाने निलंबित केले आहेत. उर्वरित चालकांवर दंडात्मक कारवाई करत एकूण ५५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान जादा भाडे आकारणाऱ्या २९, ‘मीटर फास्ट’ ठेवणाऱ्या १०, जादा प्रवासी घेणाऱ्या १, भाडे नाकारणाऱ्या १० आणि उद्धट वर्तन करणाऱ्या १७ रिक्षाचालकांचा समावेश असून विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर चालकांवर देखील कारवाई करण्यात आली.शहरात वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आरटीओने ही मोहीम राबवली होती. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी सांगितले की, कोणत्याही ऑटो रिक्षाचालकाने नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल.
प्रवाशांना सल्ला Pune RTO देण्यात आला आहे की, जर रिक्षाचालक जादा भाडे आकारतात, मीटर फास्ट ठेवतात किंवा उद्धट वर्तन करतात, तर प्रवाशांनी आपले नाव, मोबाइल क्रमांक आणि संबंधित रिक्षाचा फोटो ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा. प्राप्त तक्रारीवर तत्काळ कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात सध्या ओला, उबेर या ॲपद्वारे रिक्षा बुक केल्यानंतरही नियमभंग होत असल्याचे ग्राहकांकडून तक्रारी येत आहेत. ॲपमध्ये नियमानुसार भाडे दिसत असताना, रिक्षा घरासमोर येताच मीटरने जादा भाडे आकारले जाते, यावर शहरभर वाद सुरू आहे. ग्राहकांची मागणी आहे की, आरटीओने या प्रकारांकडे लक्ष देऊन प्रवाशांचा भाडा फसवण्याच्या प्रकारांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवावे.