हनुमान नगरात शिवजयंती उत्साहात साजरी

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
नागपूर,
Hanuman Nagar विदर्भ ज्येष्ठ नागरिक महामंडळ आणि हनुमान नगर ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चौकोनी मैदानातील विरंगुळा केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश तेलंग व सचिव अशोक भुताड यांनी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून केली.
 
Hanuman Nagar
 
नागपूरचे सुप्रसिद्ध वक्ता व ज्येष्ठ किर्तनकार चंद्रकांत वझलवार यांनी शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सरदार आणि त्यांच्या अतुलनीय राष्ट्रकार्यावर विशेष प्रकाश टाकला. Hanuman Nagar अध्यक्ष तेलंग व सचिव भुताड यांनी महाराजांच्या रणनीती व अठरापगड समाजाला संघटित करण्याच्या कौशल्याची माहिती उपस्थित जेष्ठ नागरिकांना दिली.
 
हनुमान नगर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव मोहन झरकर यांनी एका मराठी नाटकातील खुद्द औरंगजेबाच्या संवादातून “शिवाजी महाराजांची किर्ती आसमंतात कशी विस्तारली” हे अधोरेखित केले. Hanuman Nagar  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजा अंबारे यांनी केले. “नमो शिवाजी राजा” या महाआरतीनंतर प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला हनुमान नगर येथील मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
सौजन्य: आशुतोष ठोंबरे, संपर्क मित्र