दहावीच्या परीक्षा केंद्रावरच विद्यार्थिनीचा मृत्यू

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
मोरेना,
Student dies at 10th standard मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील बनमोर येथे दहावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. सकाळी गणिताचा पेपर सुरू असताना परीक्षा केंद्रात बसलेली एक विद्यार्थिनी अचानक जागेवरून कोसळली. उपस्थित पर्यवेक्षकांनी तातडीने धाव घेत तिची मदत करण्याचा प्रयत्न केला आणि वरिष्ठांना कळवले.
 

Student dies at 10th standard 
 
ही विद्यार्थिनी ग्वाल्हेर जिल्ह्यातील चाकुनारा गावातील रहिवासी असून ती आपल्या भावासोबत परीक्षा देण्यासाठी आली होती. दोघांनीही एकाच शाळेतून अर्ज भरला होता. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी परीक्षा केंद्राकडे धाव घेतली. प्रकृती गंभीर झाल्याने तिला तातडीने ग्वाल्हेर येथील रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर परीक्षा केंद्रात शोककळा पसरली. प्राथमिक अंदाजानुसार तिला तीव्र अशक्तपणा व कुपोषणाचा त्रास असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आला असावा, अशी चर्चा आहे. तथापि, नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत.