आठवीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
student-suicide : आई-वडिलांमध्ये सुरू असलेल्या घरगुती वादामुळे सतत नैराश्यात राहणाèया शाळकरी मुलीने घरातच गळास लावत आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. हुडकेश्वर पाेलिस हद्दीतील न्यू म्हाळगी नगरातील शिवाजी लेआऊटमध्ये ही घटना घडली. आनंदी असे मृत मुलीचे नाव आहे.
 
 
 
k
 
 
 
आई- वडिलांमधील वादामुळे टाेकाचा निर्णय घेत जीवनयात्रा संपवणारी मुलगी आनंदी ही इयत्ता आठव्या वर्गातली विद्यार्थीनी हाेती. इतक्या लहान वयात तिने हा निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे. मुलीच्या या निर्णयामुळे कुटुंबिय देखील दु:खाच्या खायीत बुडाले आहेत. माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतलेल्या हुडकेश्वर पाेलिसांनी पंचनामा करत मृतदेह खाली उतरवत ताे शवविच्छेदनासाठी मेडिकलला रवाना केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली.