ट्रम्पकडून सोलर पॅनलवर 126 टक्के टॅरिफ

भारत-अमेरिका कराराला हादरा

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
वॉशग्टन,
Trump imposes 126 percent tariff on solar panels अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून होणाऱ्या सोलर पॅनल आयातीवर तब्बल 126 टक्के प्रारंभिक शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भारत-अमेरिका दरम्यान सुरू असलेल्या महत्त्वाच्या व्यापार करारासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने हा निर्णय घेताना असा दावा केला की, भारत सरकार आपल्या देशांतर्गत सोलर पॅनल उत्पादन उद्योगाला अनुचित सबसिडी देत आहे. त्यामुळे भारतीय सोलर मॉड्यूल्स अमेरिकन उत्पादकांच्या तुलनेत खूपच स्वस्त पडत असून अमेरिकेतील स्थानिक उद्योगाला नुकसान होत आहे.
भारतसोबतच अमेरिकेने इंडोनेशिया 86 ते 143 टक्के आणि लाओस 81 टक्के इतके प्रारंभिक शुल्क जाहीर केले आहे. या निर्णयामुळे आग्नेय आशियातील सोलर पुरवठा साखळीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
 
 
 
 

solar 
 
काही आठवड्यांपूर्वीच भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचा प्राथमिक आराखडा निश्चित झाला होता. या आराखड्यानुसार भारतीय निर्यातीवर लावले जाणारे शुल्क 50 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव होता. अशातच हा नवा निर्णय आल्याने याचा भारत-अमेरिका करारावर कसा परिणाम होईल, हे लवकरच दिसणार आहे.