विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली 'नको ते बोलून गेले'

    दिनांक :25-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Vijay Wadettiwar राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत समोर आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होत असताना या गंभीर विषयावर जोरदार खडाजंगी झाली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका करताना आक्रमक भूमिका घेतली; मात्र भाषणादरम्यान त्यांची जीभ घसरल्याने सभागृहात क्षणभर स्तब्धता पसरली.
 

Vijay Wadettiwar statement, Maharashtra farmer suicides 
राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारवर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. “एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत आणि दुसरीकडे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या चर्चा सुरू आहेत,” अशी टीका त्यांनी केली. राज्यातील १४ जिल्ह्यांत आत्महत्यांचे प्रमाण गंभीर असल्याचे सांगताना त्यांनी २१ हजार शेतकऱ्यांच्या मृत्यूचा उल्लेख केला आणि त्यापैकी केवळ १० हजार कुटुंबांनाच शासनाने मदत केल्याचा दावा केला. भाषणादरम्यान वापरलेल्या अयोग्य शब्दामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
 
 
वडेट्टीवार यांनी Vijay Wadettiwar पुढे राज्यपालांच्या भाषणावर खेद व्यक्त करत सरकारवर सामाजिक सलोखा बिघडवल्याचा आरोप केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी राज्यात महापुरुषांच्या विचारांचा सन्मान होत नसल्याची टीका केली. मागील राज्यपालांच्या भाषणातील मुद्दे आणि आताच्या भाषणातील आशयात फारसा फरक नसल्याचेही त्यांनी नमूद केले.दरम्यान, प्रश्नोत्तराच्या तासात सादर झालेल्या आकडेवारीनुसार २००९ ते २०२५ या कालावधीत राज्यात २७ हजार ८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. केवळ २०२५ या वर्षातच २०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा हे विभाग सर्वाधिक प्रभावित असून या दोन विभागांत १९८७ प्रकरणांची नोंद झाली आहे.
शेतकऱ्यांच्या Vijay Wadettiwar वाढत्या आत्महत्यांमुळे राज्यभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चातील वाढ आणि हमीभावाचा प्रश्न या कारणांमुळे शेतकरी अडचणीत सापडत असल्याचे वारंवार अधोरेखित होत आहे. विधानसभेतील चर्चेनंतर सरकारकडून ठोस उपाययोजना जाहीर होणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.