“मी तुला कुशीत घेऊन नाही आलो…” हे काय म्हणाला विशाल? रुचिताचा पारा चढला

राखी-विशाल वादानंतर घरात तणाव वाढला

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
मुंबई
Bigg Boss Marathi 6 या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये दिवसेंदिवस नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. कालपर्यंत एकमेकांचे जिवलग वाटणारे स्पर्धक आता थेट आमनेसामने उभे ठाकताना दिसत आहेत. खेळ जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी घरातील समीकरणे बदलत असून मैत्री आणि गटबाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
 

Bigg Boss Marathi 6 
चॅनेलकडून प्रदर्शित करण्यात आलेल्या Bigg Boss Marathi 6 नव्या प्रोमोमध्ये रुचिता आणि विशाल यांच्यात तीव्र वाद झाल्याचे दिसते. या प्रोमोमध्ये राखी तन्वीला आयुष तिचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगताना दिसते. त्यावर तन्वी संतप्त होते. तन्वीची बाजू घेत विशाल राखीला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि आयुष फक्त तिचा मित्र असल्याचे स्पष्ट करतो. मात्र, हे पाहून रुचिताचा राग अनावर होतो. “मला कोणी काही बोललं तर तू हसत उभा राहतोस, पण तन्वीवर आलं की तिची बाजू घेतोस,” असे म्हणत ती विशालला जाब विचारताना दिसते. त्यावर विशाल, “मी इथे कुणाला कुशीत घेऊन आलो नाही,” असे उत्तर देत कॅमेऱ्यासाठी खेळणे थांबवण्याचा सल्लाही देतो. या संवादामुळे घरातील तणाव अधिकच वाढल्याचे स्पष्ट होते.दरम्यान, गणिताच्या टास्कदरम्यान राखी आणि विशाल आमनेसामने आल्याने वातावरण चिघळले. टास्कमध्ये विशालने राखीला उचलून पूलजवळ नेल्याने ती संतापली आणि “मला हात लावू नकोस,” असा इशारा दिला. या घटनेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक प्रेक्षकांनी विशालच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे.
 
 
आता या संपूर्ण Bigg Boss Marathi 6 प्रकरणावर शोचे सूत्रसंचालक Riteish Deshmukh काय भूमिका घेणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. येत्या ‘भाऊच्या धक्क्या’त या वादावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. रुचिताचे भडकणे खरोखरच भावनिक प्रतिक्रिया होती की केवळ फुटेजसाठी केलेली चाल, याचा उलगडा पुढील भागात होणार आहे.‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात सुरू असलेल्या या घडामोडींमुळे स्पर्धा अधिकच रंगतदार बनली असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुढील काही दिवसांत आणखी कोणती नवी समीकरणे तयार होतात आणि कोणती मैत्री तुटते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.