सिंदी(रेल्वे) येथील ग्रामीण रुग्णालय निर्मितीला हिरवा झेंडा

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
आ. कुणावार यांच्यावर मुख्यमंत्री फिदा
 
हिंगणघाट, 
विधानसभा क्षेत्रातील सिंदी (रेल्वे) शहर तसेच येथील परिसरातील हजारो नागरिकांच्या ग्रामीण रुग्णालय निर्मितीचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. Sameer Kunawar  आ. कुणावार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी रुग्णालय निर्मितीला हिरवा झेंडा दिला आहे. यापूर्वी हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि आता ग्रामीण रुग्णालयाला हिरवा झेंडा दाखवल्याने मुख्यमंत्री फडणवीस आ. कुणावार यांच्यावर फिदा आहेत, असेच म्हणावे लागेल.
 
 
kunawar
 
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामीण रुग्णालयासाठी Sameer Kunawar आ. समीर कुणावार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने थेट मुंबई गाठून सरकारला महायुतीच्या सरकारकडे ग्रामीण रुग्णालयाचे निर्मितीकरिता साकडे घातले. नागरिकांच्या लढ्यामुळे व पाठपुराव्यामुळे सिंदीत ग्रामीण रुग्णालयाचे निर्मिती होणार आहे. काल २५ रोजी सिंदी(रेल्वे)च्या नगराध्यक्ष स्नेहल कलोडे, नप उपाध्यक्ष अखिल शेख व नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली. यावेळी आ. समीर कुणावार यांनी सिंदी (रेल्वे)ची भौगोलिक परिस्थिती, शहरी व परिसरातील रुग्णांची आरोग्य सुविधे अभावी होणारी जनतेची ओढाताण व ग्रामीण रुग्णालय हा सिंदीकरांचा हक्क व आवश्यकता असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मांडली. आ. कुणावार यांचे मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. ग्रामीण रुग्णालयाची फाईल आता वेगाने पुढे कृतीत येणार असून ग्रामीण रुग्णालय निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. रुग्णालयासोबतच शहराचे इतरही प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन आ. कुणावार यांनी दिले.
 
 
सिंदीकरांचा आरोग्याचा वनवास संपणार : आ. कुणावार
सिंदी(रेल्वे)च्या विकासासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालय ही काळाची गरज होती. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे सिंदीकरांचा आरोग्याचा वनवास आता संपणार आहे. जनतेला दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचा मला मनस्वी आनंद असल्याची प्रतिक्रिया Sameer Kunawar  आ. समीर कुणावार यांनी दिली.