कठाळे परिवारातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
नागपूर,
26 February 2026 कठाळे परिवार प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त गुरुवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी शंकर नगर चौक येथील सावरकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रकल्प प्रमुख अभिंद्र कठाळे यांनी वीर सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांवर आधारित मनोगत व्यक्त केले. त्यांच्या राष्ट्रनिष्ठा, त्याग आणि विचारधारेचा वारसा जपण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. कठाळे परिवारातील सदस्य व सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

abi 
 
 
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अभिजीत कठाळे, अजय कठाळे, मिलिंद कठाळे, गिरीश कठाळे, योगेंद्र कठाळे, राधा कठाळे, विद्या, केदार आदींनी विशेष परिश्रम घेतले. 26 February 2026“स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे”, “भारत माता की जय”, “अखंड हिंदुस्थान बनके रहेगा” या घोषणांनी परिसर दुमदुमला. सामूहिक वंदेमातरम्‌ने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य : अभिजीत कठाळे, संपर्क मित्र