बिग बॉस मराठी ६’मध्ये गणिताच्या टास्कदरम्यान राडा

राखीची विशालला कडक चेतावणी

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
मुंबई
Bigg Boss Marathi च्या घरात स्पर्धकांचा खेळ आता निर्णायक टप्प्यात पोहोचताना दिसत आहे. प्रत्येक स्पर्धक स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी विविध डावपेच आखताना दिसत असून, घरातील वातावरण अधिकच तापले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘बिग बॉसची शाळा’ भरली असून, गणिताच्या तासादरम्यानच मोठा वाद उफाळून आला आहे.
 

Bigg Boss Marathi  
कलर्स मराठीने प्रसिद्ध केलेल्या नव्या प्रोमोमध्ये गणिताचा टास्क सुरू असताना राखी आणि विशाल यांच्यात जोरदार वाद झाल्याचे दिसते. या टास्कमध्ये स्पर्धकांना पाठीवरून चेंडू पुढे न्यायचा होता. यावेळी तन्वी राखीला रुचिताकडून चेंडू हिसकावून घेण्यास सांगते. राखी चेंडू घेण्यासाठी पुढे सरसावत असतानाच मागून येत विशाल तिला उचलतो आणि थेट स्विमिंग पूलजवळ घेऊन जातो. त्यानंतर “अगली बार डाल दूंगा… माँ कसम…” असे वक्तव्यही तो करताना दिसतो. या अनपेक्षित कृतीमुळे राखी पूर्णपणे चकित झाल्याचे प्रोमोमध्ये स्पष्ट होते.विशालच्या या वागणुकीमुळे राखी संतापते आणि त्याला स्पष्ट शब्दांत सुनावते. “ही तुला शेवटची वॉर्निंग आहे. यापुढे मला हात लावू नकोस,” असा इशारा ती देते. विशाल स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असला तरी राखीच्या रोषामुळे वातावरण Bigg Boss Marathi  चिघळल्याचे दिसते.हा प्रोमो Bigg Boss Marathi 6 सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “तो मुलींना स्वतःची प्रॉपर्टी समजतो का?”, “राखीने त्याच्या कानाखाली द्यायला हवे होते,” तसेच “टास्कचा बट्ट्याबोळ कसा करायचा हे शिकून घ्या,” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी नोंदवल्या आहेत.
आता या संपूर्ण प्रकारावर शोचे सूत्रसंचालक Riteish Deshmukh ‘भाऊच्या धक्क्या’वर काय भाष्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशालच्या कृतीबाबत त्याला सुनावले जाणार का, तसेच घरात पुढे कोणती नवी समीकरणे तयार होणार, हे आगामी भागांत स्पष्ट होणार आहे. ‘बिग बॉस मराठी ६’मधील हा वाद स्पर्धेला आणखी रंगतदार बनवणारा ठरत आहे.