केअर गिव्हर नेटवर्क मीटिंग उत्साहात संपन्न

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
नागपूर, 
Caregiver Network पालक विकास बहुउद्देशीय प्रशिक्षण सेवा संस्था, दरवाडी, नागपूर येथे केअर गिव्हर नेटवर्क मीटिंग हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. संस्थेतील विशेष मुलांच्या पालकांसाठी हा मार्गदर्शनपर उपक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सीमा कामगार (अध्यक्ष – M.C.F. फाउंडेशन),प्रवीण वानखेडे (विशेष शिक्षक – लर्निंग डिसएबिलिटी तज्ज्ञ),. निलेश मेटकर (ब्लाइंड रिलिफ असोसिएशन – विशेष मार्गदर्शन), . नेहा महाजन (थेरपिस्ट) तसेच हेल्थ सायकोलॉजिस्ट (मानसिक आरोग्य समुपदेशक) उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
 

hd 
 
 
या बैठकीचा मुख्य उद्देश संस्थेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना विशेष मार्गदर्शन करणे हा होता. विशेषतः स्वमग्नता (Autism) या विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली. Caregiver Networkस्वमग्नतेचे प्रकार, लक्षणे, संभाव्य कारणे, निदान पद्धती, उपचार प्रक्रिया, विविध थेरपी, स्पीच थेरपी, वर्तन सुधारणा तंत्र तसेच संवेदनासंबंधी (सेन्सरी) अडचणी याबाबत तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.तज्ज्ञांनी पालकांच्या शंकांचे निरसन करत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक दृष्टीकोन व सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमामुळे पालकांना आवश्यक माहिती व आत्मविश्वास मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
सौजन्य :सुरेश चव्हारे, संपर्क मित्र