प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
अनिल कांबळे
नागपूर,
जुनी कामठी पाेलिस Crime ठाण्याहद्दीतील जेपीनगर कामठी परिसरात राहणाऱ्या 23 वर्षीय आराेपी तरुणाने प्रेम प्रकरणातून बारावीच्या विद्यार्थिनीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती गराेदर राहिल्यानंतर मेयाे रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर या घटनेचे बींग फुटले. या प्रकरणी जुनी कामठी पाेलिसांनी प्रियकरास अटक केली. महादेव बालाजी निपाणी (वय 23, जेपी नगर, कामठी) असे आराेपीचे नाव आहे.
Crime जुनी कामठी पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी महादेव निपाणी याने शेजारीच राहणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध प्रस्थापित केले. दीड महिन्यापूर्वी घरी काेणी नसताना महादेवने प्रेयसीला घरी बाेलावून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 21 फेब्रुवारी 2026 ला अल्पवयीन मुलीची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी मेयाे हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असताना डाॅक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली असता मुलगी पाच आठवड्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. डाॅक्टरांनी मेयाे हाॅस्पिटल चाैकीतील पाेलिसांना माहिती दिली. पाेलिसांनी अल्पवयीन मुलीची विचारपूस केली असता आराेपी महादेव निपाणी याचे नाव सांगितले. त्याने घरी बाेलवून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून बलात्कार केल्याची तक्रार केली. जुनी कामठी पाेलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करून आराेपी महादेव निपाणी याला अटक केली.