अतिवृष्टीचे तत्काळ पंचनामे करा

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
नियमित कर्जदारांना कर्जमाफी द्या

राळेगाव
सोमवार, २३ फेब्रुवारीला राळेगाव शहरामध्ये गारा, वादळवार्‍यासह अतिवृष्टी झाली. या Crop damage due to rain अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचा कापूस, तूर, हरभरा, गहू व इतरही पिकांचे अतोनात नुकसान झाले. या पिकांचे सर्वेक्षन करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने तातडीने मदत करावी, सोबतच नियमित कर्जदारांनासुद्धा कर्जमाफी द्यावी, अशा आशयाचे निवेदन राळेगाव ग्राविकाच्या वतीने तहसीलदार अमित भोईटे, तसेच निबंधकांना देण्यात आले शासनाने घोषणा केल्यानुसार कर्जमाफीची प्रकि‘या सुरू झाली आहे. पण प्रत्येक कर्जमाफीमध्ये थकीत कर्जदारांनाच कर्जमाफी केली जाते व नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांवर अन्याय होतो. त्यामुळे या कर्जमाफीमध्ये थकीत कर्जदाराप्रमाणेच नियमित कर्जदार शेतकर्‍यांचेसुद्धा कर्ज माफ करावे, अशी अपेक्षा आहे.
 
 
pik
 
Crop damage due to rain  नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना आजतागायत कुठलीही कर्जमाफी मिळाली नाही. कर्जमाफीमध्ये नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना केवळ ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळाले. पण त्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही. आम्ही नियमित कर्ज भरतो म्हणजे गुन्हा करतो का, अशी भावना नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांच्या मनामध्ये आहे, ज्याप्रमाणे थकीत कर्जदारांना कर्जमाफी होते, थकीत कर्जदारांचा सातबारा कोरा होतो, तशाच पद्धतीचा सातबारा कोरा व पद्धतीची कर्जमाफी नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांनासुद्धा मिळावी. थातुरमातुर प्रोत्साहनपर अनुदान देऊन त्यांची बोळवण केल्या गेल्यास भविष्यात कुठलाही शेतकरी कर्ज न भरण्याचीच शक्यता आहे.
 
 
Crop damage due to rain  त्यामुळे या कर्जमाफीमध्ये नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांनासुद्धा थकीत कर्जदारासारखीच वागणूक मिळावी व त्यांचेसुद्धा सर्व कर्ज माफ व्हावे. सरकारनेसुद्धा कर्जमाफी घोषणेत म्हटले होते की, ३० जून २०२६ यासाठीच आम्ही कर्जमाफी देत आहोत की, ३१ मार्च २०२६ ला शेतकरी कर्ज भरणार नाहीत ते थकीत होतील व त्यांना आपण कर्जमाफी देऊ. त्यामुळे यावेळी आश्वासन दिल्यानुसार सरसकट सर्व शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे राळेगाव ग्राविकाच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देताना ग्राविका अध्यक्ष सचिन हुरकुंडे, उपाध्यक्ष राजेश संचालक जानराव गिरी, तातेश्वर पिसे, विनोद नरड, कृष्णराव राऊळकर, विनायक नगराळे, अशोक पिंपरे, प्रभाकर राऊत, गजानन पाल, गजानन महाजन, प्रकाश मेहता, लियाकत सय्यद, रामाजी कुळसंगे, संजय दांडेकर हे शेतकरी उपस्थित होते.