होळीपूर्वीच होणार कर्मचाऱ्यांचे वेतन!

उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
लखनौ,
Employees' salaries before Holi होळीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. फेब्रुवारी महिन्याचा पगार सणापूर्वीच देण्यात येणार असून तो २८ फेब्रुवारी रोजी खात्यात जमा करण्याचे आदेश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. शालेय शिक्षण विभागासह इतर शासकीय कार्यालयांना २ मार्चपूर्वी वेतन अदा करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. होलिका दहन २ मार्च रोजी आणि त्यानंतर होळीचा सण साजरा होणार असल्याने पगार वितरणात अडथळा येऊ नये, यासाठी प्रशासनाने आगाऊ पावले उचलली आहेत.
 
 
yogi
रविवारची सुट्टी आणि सणामुळे शासकीय कामकाज बंद राहणार असल्याने वेतनवाटप उशिरा होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे.राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या मान्यतेनंतर हा निर्णय अंतिम करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबंधित विभागप्रमुखांना २८ फेब्रुवारीपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जारी करण्यात आले आहेत. होळीपूर्वी पगार मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना सण साजरा करताना आर्थिक दिलासा मिळणार आहे.