पावसाचे पाणी भुगर्भात मुरवण्यासाठी बोरचार्जर ठरणार फायदेशीर

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
वर्धा, 
Groundwater level: Borecharger on borewell यावर्षी वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. कमी कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे अतिरित पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून गेले. परिणामी, काही महिन्यांतच पिकांसाठी व पिण्यासाठी पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून पुणेस्थित सोशल इम्पॅट स्टार्टअप उर्ध्वम यांचे पेटंटेड बोरचार्जर तंत्रज्ञान उपयुत ठरत आहे.
 
 
water
 
पिपरी (मेघे), वर्धा येथे स्टिम लॅब, सायन्स लॅब आणि ई-लर्निंग प्रोजेट अंतर्गत सीएसआर उपक्रमाद्वारे शेतकर्‍यांसाठी बोरचार्जर तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे पावसाचे अतिरित पाणी बोअरवेलद्वारे थेट भूगर्भातील खोल जलधारात मुरवले जाते. त्यामुळे Groundwater level: Borecharger on borewell भूजल पातळी वाढून बोअरवेलचा पाणीपुरवठा कालावधी लक्षणीयरित्या वाढतो. सदर प्रकल्पाचा समारोप नुकताच संपन्न झाला. हा उपक्रम कर्वे समाजसेवा संस्था, कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क आणि बॅटलर ऑटोमोटिव इंडिया प्रायवेट लिमिटेड यांच्या संयुत वतीने राबविण्यात आला.
 
 
 
Groundwater level: Borecharger on borewell सीएसआर प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील २२ अल्पभूधारक शेतकर्‍यांना बॅटलर ऑटोमोटिव इंडिया प्रायवेट लिमिटेड यांनी बोरचार्जर तंत्रज्ञान मोफत उपलब्ध करून दिले. लाभार्थी संख्या मर्यादित असल्याने प्रथम नोंदणीस प्राधान्य देण्यात आले. उर्ध्वम या संस्थेने महाराष्ट्रासह १२ राज्यांमध्ये ५ हजार ७०० हून अधिक बोअरवेलवर बोरचार्जरची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. यावेळी बॅटलर ऑटोमोटिव इंडिया प्रायवेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मुकुंद गनगणे, लॉजिकल हेड आशीष कोथाळकर, फायनान्स हेड सचिन भोसले, कोहिनूर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. महेश ठाकूर, सीएसआर प्रकल्प समन्वयक जाइद, तसेच कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य डॉ. चंदू पोपटकर, डॉ. महादेव चुंचे, डॉ. विलास बैले उपस्थित होते. उर्ध्वमचे तांत्रिक अधिकारी प्रफुल्ल पाटील व त्यांच्या चमूने शेतकर्‍यांना बोरचार्जर तंत्रज्ञानाची कार्यपद्धती सोप्या शब्दांत समजावून सांगितली. कार्यक्रमात गावातील ८ ते १० शेतकरी उपस्थित होते ज्यांना या तंत्रज्ञानाचा थेट लाभ झाला असून त्यांच्या बोअरवेलमधील पाण्याची पातळी वाढल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क यांचे मोलाचे सहकार्य लाभले.