नेपाळ निवडणुकीपूर्वी भारत-नेपाळ सीमा सील!

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
काठमांडू, 
india-nepal-border-sealed नेपाळमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने भारत-नेपाळ सीमेवर कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३ मार्चच्या रात्रीपासून ६ मार्चपर्यंत त्रिवेणी परिसरातील आंतरराष्ट्रीय सीमा पूर्णपणे बंद ठेवली जाणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. शांततापूर्ण आणि निष्पक्ष मतदान सुनिश्चित करण्यासाठी हा उपाय करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
 
india-nepal-border-sealed
 
वाल्मिकी नगर सीमेवर या कालावधीत नागरिक आणि सर्वसामान्य वाहनांच्या हालचालींवर पूर्ण बंदी असेल. केवळ रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांनाच कसून तपासणीनंतर प्रवेश दिला जाईल. india-nepal-border-sealed नेपाळ सशस्त्र पोलिस दलाच्या त्रिवेणी व्हीओपीचे उपनिरीक्षक दम्मर ओली यांनी निवडणुकीच्या काळात कोणतीही अनुचित हालचाल होऊ नये, यासाठी सुरक्षा वाढवण्यात आल्याचे स्पष्ट केले. पूर्व नवलपरासीचे जिल्हाधिकारी भावीश्वर पांडे यांनी सीमा बंदीबाबत औपचारिक अधिसूचना जाहीर केलेली नसली तरी, तोंडी सूचनेनुसार कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले जाते. विशेषतः, भारतीय सीमेवरून नेपाळमध्ये प्रवेश करणाऱ्या मतदारांची ओळख आणि मतदार ओळखपत्राची पडताळणी केल्यानंतरच त्यांना पुढे जाऊ दिले जाईल.
राजकीय घडामोडींमुळे नेपाळमध्ये आधीच तणावाचे वातावरण आहे. india-nepal-border-sealed जेएनजी चळवळीनंतर माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अंतरिम व्यवस्थेत बदल होत निवडणुकीची घोषणा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. ५ मार्च रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सुमारे १.८९ कोटी पात्र मतदार प्रतिनिधी सभा या सभागृहातील २७५ सदस्यांची निवड करतील. त्यापैकी १६५ सदस्य थेट निवडणुकीतून निवडले जाणार असून ११० सदस्य प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने निवडले जातील. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सीमावर्ती भागात सशस्त्र पोलिस दल आणि इतर सुरक्षा यंत्रणा तैनात ठेवण्यात आल्या आहेत.