‘नाराजी तुमच्यावर नाही’; इस्रायली संसदेत वॉकआउटनंतर विरोधकांचा मोदींना थेट संदेश

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
जेरुसलेम,  
israeli-parliament-oppositions जेरुसलेम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायली संसदेतील भाषणापूर्वीच राजकीय वातावरण अचानक तापले. ऐतिहासिक मानल्या जाणाऱ्या या संबोधनाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या विरोधी पक्षांनी सभागृहातून वॉकआउट करत निषेध नोंदवला. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, विरोधकांनी लगेचच स्पष्ट केले की त्यांचा निषेध हा मोदींविरोधात नसून इस्रायली सरकार आणि संसदेच्या अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात आहे.
 
israeli-parliament-oppositions
 
इस्रायली दैनिकच्या वृत्तानुसार, या वादाचे मूळ नेसेटचे सभापती अमीर ओहाना यांच्या निर्णयात होते. विशेष सत्रासाठी इस्रायलच्या सर्वोच्च न्यायालयाचे अध्यक्ष इसहाक अमित यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. अशा महत्त्वाच्या प्रसंगी न्यायालय प्रमुखांना निमंत्रण देण्याची परंपरा असल्याने हा निर्णय न्यायव्यवस्थेचा अवमान असल्याचे सांगत विरोधी पक्षांनी निषेधाचा मार्ग स्वीकारला. येश अतिद, यिसरायल बेइतेनु आणि द डेमोक्रॅट्स या पक्षांनी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला. israeli-parliament-oppositions मात्र त्यांनी आधीच जाहीर केले होते की भारतीय पंतप्रधानांच्या भाषणाला ते उपस्थित राहणारच. संयुक्त निवेदनात त्यांनी मोदींना जागतिक पातळीवरील प्रभावी नेता आणि इस्रायलचा खरा मित्र असे संबोधले. नेतान्याहू यांचे भाषण संपल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी पंतप्रधान यायर लॅपिड सभागृहात परतले. त्यांनी थेट मोदींकडे जाऊन हस्तांदोलन केले आणि संसदेत त्यांचे स्वागत केले. भारतात चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठीच हा संवाद आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आज येथे जे काही घडले, त्याचा तुमच्याशी कोणताही संबंध नाही,” असे ते मोदींना म्हणाले. सत्ताधारी आघाडीतील सदस्यांकडून टीका सुरू होताच लॅपिड यांनी परिस्थिती अधिक चिघळू नये, असे आवाहन केले.
यानंतर आपल्या भाषणात लॅपिड यांनी मोदींच्या नेतृत्वाचे आणि भारत-इस्रायल मैत्रीचे कौतुक केले. कठीण काळात भारताने इस्रायलला दिलेल्या पाठिंब्याचा उल्लेख करत त्यांनी या संबंधांना शाश्वत भागीदारीचे स्वरूप असल्याचे म्हटले. सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष, सर्वजण भारतीय पंतप्रधानांचे विचार ऐकण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी नमूद केले. israeli-parliament-oppositions संसदेतील या घडामोडीनंतर लॅपिड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरही मोदींसाठी संदेश पोस्ट केला. त्यांनी लिहिले की, इस्रायलचे संपूर्ण राष्ट्र त्यांच्या नेतृत्वाचा, मैत्रीचा आणि संकटसमयी दिलेल्या पाठिंब्याचा आदर करते. या भेटीमुळे दोन्ही देशांतील संबंधांना नवे बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.