गावकर्यांची मागणी
कारंजा (घा.),
Khairwada: Police Patil खैरवाडा येथील पोलिस पाटलाच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध गावकर्यांनी एकत्र येत त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिरीष भांगे तसेच हरिभाऊ धोटे यांच्या नेतृत्वात आज गुरुवार २६ रोजी तहसीलदार अरुण निनावे व उपविभागीय अधिकारी विश्वास सिरसाट यांना निवेदन देण्यात आले.
Khairwada: Police Patil खैरवाडा येथील पोलिस पाटील यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्याबाबत गावकर्यांच्या स्वाक्षर्यांचे निवेदन ग्रामपंचायतला प्राप्त झाले होते. त्या अर्जानुसार तातडीने चर्चा करण्याकरिता २४ रोजी सभा बोलावण्यात आली. खैरवाडा येथील गावकरी यांच्या प्राप्त अर्जानुसार खैरवाडा येथील पोलिस पाटील सतीश येवले हे त्यांच्या पदाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत असून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत वारंवार ग्रामपंचायतला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यांच्या वर्तणुकीमुळे गावातील कायदा व सुव्यवस्था धोयात आली आहे. तसेच शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. गावकर्यांच्या मागणीनुसार पोलिस पाटील येवले यांची चौकशी करून त्यांना कायमस्वरूपी निलंबित करावे, अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली.
Khairwada: Police Patil यावेळी निवेदनासोबत गावातील नागरिकांचा अर्ज तसेच ग्रामस्थांच्या तक्रारींच्या चर्चेचा अहवालही सादर करण्यात आला. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आली. पोलिस पाटील हे गावात झालेल्या वादात निर्णय घेताना भेदभाव करतात. त्यांना तक्रारीविषयी विचारणा केली असता पोलिस पाटील येवले हे गावकर्यांना समाधानकारक उत्तर देत नसल्याचेही अहवालात नमूद आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींच्या अनुषंगाने २४ रोजी सरपंच दिलीप साठे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी पोलिस पाटील येवले यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्याचा ठराव चर्चेतून घेण्यात आला. निवेदन देताना माजी उपसरपंच नरेश तायडे, साहेबराव कोल्हे, कैलास मरसकोल्हे, ओमप्रकाश धुर्वे, हर्षल गिरी, सुनील मसराम, रामभाऊ युवनाते आदी उपस्थित होते.