अल्पवयीन मुलीस पळविणारा जेरबंद

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
*अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कामगिरी
 
वर्धा, 
kidnapper arrested अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा समीर बावणे (२४) रा. देवळी शिताफीने अटक करून पीडित मुलीचा छडा लावण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या चमूला यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय मुलीस अज्ञात व्यतीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार १७ ऑटोबर २०२५ रोजी देवळी पोलिस ठाण्यात मुलीच्या कुटुंबीयांनी दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर संबंधित प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वळता केला.
 
 
arests
 
kidnapper arrested  स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी गोपनीय माहितीच्या आधारे शिर्डी येथून वर्धेत येत असलेल्या आरोपी व पीडित मुलीस रेल्वे स्टेशन वर्धा येथून ताब्यात घेतले. मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले असून आरोपीस अटक करून पुढील कारवाईसाठी देवळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशानुसार सुभाष राऊत, दिवाकर परिमल, खुशालपंत राठोड, नितेश मेश्राम, अलका कुभंलवार, नवनाथ मुंडे, अक्षय राऊत, गोविंद मुंडे यांनी केली.