लालपरीची सवलत हवीय..? एनसीएमसी कार्ड काढा..!

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
उमरखेड, 
Lalpari discount: NCMC card रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला. यापुढे सवलतींचा लाभ घेणार्‍या प्रवाशांसाठी ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य असणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून हा बदल केला आहे. शिवाय कॅशलेस प्रवासाला चालना देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
 
 

st
 
सध्या एसटीच्या आगारांत ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यासह अन्य अधिकृत केंद्रावर देण्याचे नियोजन सुरू आहे. या कार्डमुळे प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार असल्याचा दावा केला जात आहे. सवलतीची अचूक नोंद, रोखविरहित व्यवहार आणि पारदर्शक प्रतिपूर्ती ही तिन्ही वैशिष्ट्ये एकाच कार्डमध्ये असतील. या कार्डशिवाय आता सवलतीची Lalpari discount: NCMC card  लालपरी गाठणे कठीण होणार आहे. खिशात कार्ड नसेल, तर प्रवासासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सुरुवातीला तरी प्रवाशांना त्रास सहन होणार आहे. आधार कार्ड साधे ओळखपत्र दाखवून निम्म्या तिकिटात प्रवास करणार्‍या महिला आणि शंभर टक्के सवलतीचा आनंद घेणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना आता सवलतीच्या प्रवासासाठी ’नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ अनिवार्य केले आहे. एनसीएमसी कार्ड १९९ रुपयांना पडणार असून जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांच्या सवलतीच्या दरात ते उपलब्ध होणार आहे. हे कार्ड केवळ ओळखपत्र ते एक प्री-पेड वॉलेट आहे. किमान १०० रुपयांचा बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे. प्रवाशांना ५० रुपयांच्या पटीत ते रिचार्ज करता येईल.
त्रासदायक ठरणार..?
ग्रामीण भागातील चित्र वेगळे आहे. रांगेत उभे राहून कार्ड काढणे, ते वेळेवर रिचार्ज करणे आणि तांत्रिक अडचणी हाताळणे, यामुळे ग्रामीण महिला, ज्येष्ठांंची ससेहोलपट होणार असल्याचे प्रवाशांचे आहे.