हिंदी विद्यापीठला दुपारी २. २२ ला आली सावरकरांची आठवण

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
वर्धा :
स्थापनेपासून कायम वादग्रस्त राहत आलेल्या Mahatma Gandhi International Hindi University महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सुट्टी न देण्याचा विषय ताजा असतानाच आज पुन्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथी ची आठवण दुपारी दोन वाजून 22 मिनिटांनी आली. त्यामुळे हिंदी विश्व विद्यापीठातील सावरकर भक्तांना तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे.
 

war 
 
Mahatma Gandhi International Hindi University  महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विषय विद्यापीठांमध्ये 19 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सुट्टी जाहीर न केल्याने छत्रपती शिवाजी महाराज भक्तांनी प्रचंड महाराज व्यक्त केली आहे. यासंदर्भात वरिष्ठांसोबत पत्र व्यवहारी झालेल्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आलेले असताना आज सावरकर पुण्यतिथीनिमित्त पुन्हा दुपारी दोन अजून 22 मिनिटांनी ई-मेलवर पत्र पाठवून सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे पुन्हा हे विद्यापीठ वादात सापडलेले आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत सवडकर पुण्यतिथीची आठवण विद्यापीठ प्रशासनाला नव्हती का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.