अहेरी,
earthquake gadchiroli गडचिरोली जिल्ह्यातील अहिरी परिसराच्या पूर्वेस सुमारे 6.2 किमी अंतरावर गुरुवारी मध्यरात्री 12.00 वाजण्याच्या सुमारास भूकंपासारखा सौम्य धक्का जाणवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा प्रकार सध्या अप्रमाणित असल्याचे समजते.
काही नागरिकांनी मध्यरात्री घरात हलकी कंपने जाणवल्याचे सांगितले. तथापि, अद्याप अधिकृत भूकंपमापन केंद्र किंवा संबंधित शासकीय यंत्रणेकडून याबाबत अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. भूकंपाची तीव्रता, केंद्रबिंदूची अचूक खोली आणि संभाव्य परिणाम याबाबतची माहिती प्रतीक्षेत आहे.
स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.earthquake gadchiroli कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा.
अधिकृत माहिती मिळताच पुढील तपशील जाहीर करण्यात येतील.