नागपूर विमानतळाच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी निवेदन

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
विमानतळ हस्तांतरणास अंतिम मान्यता प्रलंबित
एआयडीकडून प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा

नागपूर,
Nagpur Airport मिहान इंडिया लिमिटेडने २०१८मध्ये नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्विकासाकरिता जीएमआर एअरपोर्ट लिमिटेड यांना प्रकल्पाचे काम देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित होते, यासंदर्भात गतवर्षी अनुकूल निर्णय मिळाल्यानंतर नागपूर विमानतळ हस्तांतरणास अंतिम मान्यता अद्याप प्रलंबित आहे. विमानतळाच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले आहे.


nagpur-airport 1 
 
अंमलबजावणीसाठी आवश्यक निर्देश द्यावेत
मुख्यत: विमानतळाच्या विकास कामांना विलंब होत असल्यामुळे इतर महत्वपूर्ण प्रकल्पाच्या अडथळे निर्माण होत असल्याचे असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या वतीने नमुद करण्यात आले आहे. केंद्र शासनाने विचारलेल्या सर्व शंकांचे निरसन महाराष्ट्र शासनाने केले असल्याने हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या स्तरावर विचाराधीन आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पातळीवर हा प्रस्ताव प्रलंबित असल्याने, पंतप्रधानांनी यामध्ये हस्तक्षेप करून तातडीने मान्यता देऊन वेळबद्ध अंमलबजावणीसाठी आवश्यक निर्देश द्यावेत, मागणी असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या वतीने करण्यात आली आहे.
४२ हजार कोटींचे करार
Nagpur Airport मध्यवर्ती नागपूरसह संपूर्ण विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्विकास व विस्तार प्रकल्पास गती देणे आवश्यक झाले आहे. एआयडीतर्फे अ‍ॅडव्हांटेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवात ४२ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे करार करण्यात आले. महिंद्रा अँड या कंपनीसोबत १५ हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. याशिवाय उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन नागपूर जिल्ह्यात स्किल अँड लॉजिस्टिक्स युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची प्रक्रिया एआयडीने सुरू केली आहे.
औद्योगिक व आर्थिक प्रगतीस बळ मिळणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पुनर्विकास व क्षमता विस्तार झाल्यानंतर गुंतवणूकदारांकडून नवे प्रकल्प सुरु होण्याची वाढली आहे. उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकार्‍यांचा प्रवास, हवाई मालवाहतूक आणि अखंड पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी सुसज्ज व विस्तारित विमानतळ अत्यावश्यक असल्याचे मत असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या वतीने व्यक्त केले आहे. निवेदनाची एक प्रत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के.आर.नायडू, व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील करण्यात आली आहे.
Nagpur Airport नागपूर विमानतळाच्या धावपट्टी दुरुस्तीपासून ते सर्वोच्च न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर एआयडीने पाठपुरावा केला आहे. या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधेचे वेळेत पूर्णत्व झाल्यास वरिष्ठ प्रवास सुलभ होईल, हवाई मालवाहतूक क्षमता बळकट होईल, पुरवठा साखळी कार्यक्षमता सुधारेल आणि विदर्भाच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीस नवे बळ मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘आत्मनिर्भर भारतच्या दूरदृष्टीशी सुसंगत ठरेल, असा विश्वास एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे यांनी व्यक्त केला आहे.