राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सस्पेन्स संपणार

सुनेत्रा पवार होणार एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष?

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Nationalist Congress Party राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सस्पेन्स आज संपणार आहे. वरळी येथील 'डोम' येथे आज संध्याकाळी ४ वाजता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे.
 

Nationalist Congress Party  
आमदार Amol Mitkari यांच्या मते, सुनेत्रा पवार यांची निवड एकमताने होण्याची दाट शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आमदार मिटकरी म्हणाले, "सुनेत्रा वहिनींना एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी आम्ही सर्व आमदार वरळीला जात आहोत. या प्रक्रियेबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये आधीच चर्चा झाली असून आज त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल."या बैठकीदरम्यान राजकीय बाजू बाजूला ठेवून, अजित पवार यांच्या अपघातानंतरची एफआयआर प्रक्रिया देखील चर्चेत आली. मिटकरी यांनी सांगितले की, "माझा आणि Rohit Pawar यांचा राजकीय प्लॅटफॉर्म वेगळा असला तरी, हा प्रश्न Nationalist Congress Party  माझ्या नेत्याच्या अपघाताचा आहे. अजित पवार यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या डीजीसीए आणि VSR कंपनीवर एफआयआर दाखल करण्यासाठी मी रोहित पवारांसोबत पोलीस ठाण्यात गेलो होतो. केवळ रोहित पवारच नाहीत, तर एमआयएम किंवा काँग्रेसच्या आमदारानेही हा लढा सुरू केला असता, तरी मी त्यांच्यासोबत गेलो असतो."वरळीच्या 'डोम' येथे आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीनंतर पक्षाच्या नेतृत्वाचे स्वरूप स्पष्ट होणार असून, पक्षाच्या कार्यकारिणीत या निर्णयाचे मोठे परिणाम दिसणार आहेत.