कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सापडले आणखी एक अर्भक

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
नागपूर, 
गड्डीगाेदाम परिसराला लागून असलेल्या सेंट जाॅन शाळेच्या पाठीमागील भिंतीलगत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर नुकतेच जन्मलेले Newborn अर्भक मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. पुरुष जातीच्या या बाळाच्या पाेटाला नाळ देखील तुटलेली नव्हती. त्यामुळे नुकताच जन्म झाल्यानंतर नवजात बाळाला मध्यरात्रीनंतर येथे काेणीतरी आणून टाकले असण्याची शक्यता आहे.
 
 
arbhak
(संग्रहित छायाचित्र ) 
 
चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेल्या झुंड चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झाेतात आलेल्या माेहन नगर झाेपडपट्टीला लागून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. कचराफेकण्यासाठी सकाळी साडेसहाच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे गेलेल्या नागरिकांना हा प्रकार दिसला. त्यांनी सदर पाेलिसांना याची माहिती दिली. सदर पाेलिसांचे पथक घटनास्थळावर पाेहचले. पाेलिसांना हे नवजात बाळ मृतावस्थेत असल्याची नाेंद केली. पंचनामा करत पाेलिसांनी Newborn  बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयाे) रवाना केला.
 
 
आठवड्यात दुसऱ्यांदा सापडले मृत अर्भक
अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ नकाेसे झाल्यामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर नवजात बाळाला फेकून देण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. साेमवारी अंबाझरी पाेलिस हद्दीतील हिलटाॅप परिसरात ही घटना घडली हाेती. रस्ते महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर देखील असेच एक अर्भक मृतावस्थेत सापडले हाेते. या दाेन्ही घटनांमुळे नुकत्याच जन्मलेली अर्भके मृत आढळल्याने हळहळ व्यक्त हाेत आहे.