विठोलीची पीएमश्री शाळा इतर शाळांसाठी प्रेरणादायी मॉडेल

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
केंद्र व राज्य सरकारी अधिकार्‍यांकडून पाहणी दरम्यान कौतुक
 
मानोरा, 
केंद्र शासनाच्या पीएमश्री Pradhan Mantri Schools for Rising India ( प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया) योजनेअंतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध शैक्षणिक, तांत्रिक व सर्वांगीण विकास उपक्रमांची अंमलबजावणी व त्याचा विद्यार्थ्यांवर झालेला सकारात्मक परिणाम तपासण्यासाठी पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, विठोली येथे उच्चस्तरीय अधिकार्‍यांची संयुक्त पाहणी उत्साहात पार पडली.
 
 
school
 
या पाहणी दौर्‍यात भारत सरकारचे संयुक्त सचिव मुथ्थुकृष्णन शंकरनारायणन, जिल्हा परिषद वाशीमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण, प्राचार्य राजेंद्र महाजन, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय ससाणे, उप शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, गटविकास अधिकारी पं. स. मानोरा विलास जाधव, गटशिक्षणाधिकारी मानोरा अनिल पवार, तसेच सीडीपीओ कदम यांनी शाळेस भेट दिली. पाहणीदरम्यान मान्यवरांनी शाळेत राबविण्यात येणारे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम प्रत्यक्ष अनुभवले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान मॉडेल्स,डिजिटल सादरीकरणे, वाचन प्रात्यक्षिके व गणितीय संकल्पनांच्या प्रभावी मांडणीने मान्यवर प्रभावित झाले.विद्यार्थ्यांमध्ये वाढलेला आत्मविश्वास,सुधारलेली उपस्थिती, गुणवत्तापूर्ण अध्यापन वातावरण आणि शाळेचा सर्वांगीण विकास याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
 
 
Pradhan Mantri Schools for Rising India  मान्यवरांनी नमूद केले की, पीएमश्री योजनेंतर्गत विठोली शाळेने केलेली प्रगती उल्लेखनीय असून, ही शाळा जिल्ह्यातील इतर शाळांसाठी प्रेरणादायी मॉडेल ठरू शकते. निधीचा पारदर्शक व परिणामकारक वापर तसेच शिक्षकांचे समर्पित प्रयत्न यांचे विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन केंद्रप्रमुख ताराचंद चौधरी, मुख्याध्यापक अर्जुन लोंढे व शिक्षकवृंद भोयर, तायडे, लता इकडे, मनवर मॅडम, गायत्री मॅडम, रीना मॅडम, राऊत मॅडम व मानोरा पं. स.मधील साधन व्यक्ती ताळेगावकर, डोळस, मेहल्डे, राठोड, विनोद कांबळे, केंद्रप्रमुख सुधीर काळे, विशेष शिक्षक जाधव, गोकुळ आडे, भांबुलकर, डेटा एन्ट्री ऑपरेटर इलियासभाई, कपिल इंगोले, लेखा साहाय्यक विरेंद्र पाटील, सरपंच जयमालाताई पाटील, ग्रापं सदस्य ढोले,संतोष कांबळे, वेणूधर पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष स्वप्नील पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल राठोड,उपाध्यक्ष गोपाल चांदोडे यांच्या समन्वयाने यशस्वीरीत्या पार पडले. शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार विवेक कुलकर्णी यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.