बारामती,
Rohit Pawar's stay at the police station बारामतीत दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत गुन्हा नोंदवून सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरले. या प्रकरणात तातडीने प्रथम माहिती अहवाल नोंदवावा, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार Rohit Pawar हे बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले असून ते बराच वेळ अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. त्यांच्या सोबत युगेंद्र पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, तर पोलीस ठाण्याबाहेर हजारो समर्थकांनी गर्दी केली होती.

अजित पवार यांचे भाऊ राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. माध्यमांशी बोलताना राजेंद्र पवार यांनी या दुर्घटनेमागील सत्य जनतेसमोर यावे, अशी भूमिका मांडली. तपासाबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने संशय वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.विमान दुर्घटनेच्या चौकशी प्रक्रियेवरही आंदोलनकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले. दुर्घटनेतील यंत्रणा पूर्णपणे नष्ट झाल्याचे सांगितले जात असले तरी त्याबाबत शंका निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला. काही शक्ती गुन्हा नोंदवण्यास अडथळा आणत असल्याचा आरोपही करण्यात आला. संबंधित विमान कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अपघाताचा सविस्तर अहवाल जाहीर करावा आणि वरिष्ठ पातळीवरून स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
युगेंद्र पवार यांनीही या प्रकरणात सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे सांगत सर्वजण रोहित पवार यांच्या भूमिकेच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. संबंधित तपास अहवालात काही बाबींवर प्रश्न उपस्थित झाले असल्याचा उल्लेख करत त्यांनी विमान कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पुन्हा केली. दरम्यान, बारामती पोलीस ठाण्याबाहेर तणावपूर्ण वातावरण असून मागणी पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया जाहीर करण्यात आलेली नाही.