संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता

काय आहे प्रकरण?

    दिनांक :26-Feb-2026
Total Views |
मुंबई
Sanjay Raut शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांना मीरा भायंदर महापालिका क्षेत्रातील शौचालय घोटाळा प्रकरणात सत्र न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे. या प्रकरणाची सुरुवात संजय राऊत यांनी सोमय्या दाम्पत्यावर १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केल्याने झाली होती. या आरोपांविरोधात डॉ. मेधा सोमय्या यांनी माझगाव कोर्टात मानहानीची याचिका दाखल केली होती.
 

Sanjay Raut acquittal, Shiv Sena MP Sanjay Raut, Medha Somaiya defamation case 
माझगाव न्यायालयाने याआधी संजय राऊत यांना २५ हजार रुपयांचा दंड आणि १५ दिवसांची कैद अशी शिक्षा सुनावली होती. मात्र, या शिक्षेला संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले. या युक्तीवादानंतर आज निकालाची घोषणा झाली असून, सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना निर्दोष मुक्त केले आहे.
या निकालानंतर किरीट सोमय्या Sanjay Raut यांनी प्रतिक्रिया दिली असून, “मी या निकालाचा सविस्तर अभ्यास करून त्यावर सविस्तर भाष्य करेन,” असे सांगितले आहे. कोर्टात संजय राऊत, किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या हे सर्वजण वकिलांसह उपस्थित होते. कोर्टाने संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता केल्यावर, ते बाहेर पडताना मेधा सोमय्या यांना नमस्कार करत बाहेर आले.संजय राऊत लवकरच या प्रकरणावर प्रसारमाध्यमांशी सविस्तर भाष्य करणार आहेत. मीरा रोड येथील या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात भरभराटीचा वाद निर्माण झाला होता, परंतु सत्र न्यायालयाचा हा निर्णय त्यांच्या बाजूला गेल्याचे मानले जात आहे.