गुन्हा दाखल झाल्यानंतरही फोडला गणिताचा पेपर

- सूत्रधार अद्याप फरार ः राज्यभर जाळे असल्याचा संशय

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
12th paper leack बारावीचे फिजिक्स आणि केमेस्ट्री हे दाेन पेपर फोडल्यानंतर सदर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. पेपर फुटीच्या प्रकरणाची दखल शिक्षण मंत्र्यांसह गृहमंत्र्यांनी घेतली हाेती. या घटनेमुळे नागपूर राज्यभरात चर्चेत आल्यानंतरही आराेपींनी 21 तारखेला असलेला गणिताचा पेपर फोडला. गणिताच्या पेपरची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या माेबाईलवर आली हाेती, अशी धक्कादायक माहिती पाेलिसांच्या तपासात उघडकीस आली.
 

paper leack  
 
 
सदर येथील सेंट उर्सूला शाळेतील परीक्षा केंद्रावर गेल्या शुक्रवारी एका विद्यार्थीनीकडून माेबाईल जप्त करण्यात आला हाेता. त्यामध्ये एका व्हाॅट्सअप ग्रूपमध्ये काही विद्यार्थी हाेते आणि त्यात निशिकांत मुल याने प्रश्नपत्रिका पाेस्ट केली हाेती. त्यात फरहान अख्तर नावाच्या शिक्षकाने प्रश्नपत्रिकेचे उत्तरे पाेस्ट केली हाेती. विद्यार्थिनीच्या संशयास्पद हालचालींमुळे केमेस्ट्रीचा पेपर फुटल्याची बाब समाेर आली. ही विद्यार्थीनी वारंवार स्वच्छतागृहात जात असल्याने पर्यवेक्षिकेच्या सतर्कतेमुळे पेपर ुटीचे प्रकरण चव्हाट्यावर आले. लगेच परीक्षा केंद्रावर पेपर साेडवत असलेल्या दुसऱ्याही विद्यार्थिनीकडून माेबाईल ताब्यात घेण्यात आला. त्यावरुन पेपर लिक करणारे माेठे रॅकेट सुरु असल्याचे लक्षात आले हाेते. त्या विद्यार्थिनीच्या माेबाईलमधून पाेलिसांना केमेस्ट्रीसाेबतच फिजिक्सचा पेपर आणि त्याच्या पर्यायी उत्तर पत्रिकेचा संच सापडला हाेता. या प्रकाराने राज्यातील शैक्षणिक वर्तूळात खळबळ उडाली हाेती. त्यामुळे पेररुटीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी स्थानिक स्तरावर पाच पाेलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले. या पथकाने तज्ज्ञांच्या माध्यमातून माेबाईलमधून डिलिट केलेला डेटा पूर्ववत मिळवण्यात यश मिळवले आहे. यात डिजिटल फुटप्रिंटमध्ये भाैतिक आणि रसायनशास्त्रासाेबतच गणिताचा पेपरही फुटल्याचे सबळ पुरावे पथकाच्या हाती लागले आहेत.
हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर पाेलिसांनी यापूर्वी खासगी शिकवणी वर्गातला शिक्षक निशिकांत मूल, फरहान अख्तर, माेमिनपुरा भागातील एक्सेलन्ट अकादमीचा संचालक मुस्ता खान व जुनेद माेहम्मद अब्दुल जावेद या चाैघांना आतापर्यंत अटक केली आहे. तर एका विद्यार्थ्याला परीक्षेमुळे शैक्षणिक पार्श्वभूमीवर न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे.
........
राज्यभर पसरले जाळे
पेपर फुटीचे प्रकरण समाेर आल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतरही 21 फेब्रुवारीचा गणिताचा पेपर फोडण्यात आला. राज्यात खळबळ उड़ाली असतानाही पेपर फोडण्याची हिम्मत आराेपींनी केली.12th paper leack यावरुन पेपर फुटीसाठी काेट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचा संशय आहेत. पेपर फुटीच्या प्रकरणात एका विद्यार्थ्यांकडून प्रतिपेपर 25 हजार घेण्यात आले हाेते. हे रॅकेट राज्यभर पसरलेले असून शेकडाे काेटी रुपये या माध्यमातून कमविण्यात आले असून यामध्ये शिक्षण विभागाचा वाटा असल्याची शक्यता आहे.
.......
मुख्य सूत्रधार अद्यापही फरार
सदर पाेलिसांनी पाच जणांवर पेपर फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र, ज्या आराेपीने शहरातील काेचिंग क्लासेसच्या संचालकांना पेपर दिले, ताे मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहे. त्या आराेपीचा कसून शाेध सुरु आहे. सर्व आराेपींची न्यायालयाने मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.