'राजकारणात भूकंप' आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्यात मतभेद उघड

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Aditya Thackeray, देशभरात राज्यसभेच्या 36 जागा रिक्त होत आहेत, त्यात महाराष्ट्रातून सात जागा आहेत. निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये भाजपचे डॉ. भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार व फौजिया खान, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी आणि काँग्रेसच्या रजनी पाटील यांचा समावेश आहे.
 

Aditya Thackeray, Sanjay Raut, 
महाराष्ट्र विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीकडे सहा जागा आणण्याची क्षमता आहे, तर महाविकास आघाडीकडे एक जागा येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गटाचे 20, काँग्रेसचे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार आहेत.राज्यसभेच्या या एका जागेवरुन महाविकास आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले, “मोठी नावं चर्चेत आली तर यावेळी Aditya Thackeray आमची जागा जाईल. रोटेशननुसार काँग्रेस पुढच्या वेळी मागणी करेल. देश पातळीवर शिवसेनेचा आवाज महत्वाचा आहे. आमची दोन सीटस यावे, आमच्या खासदारांची उपस्थिती आणि भाषणे यावरून हे ठरवा.”दुसरीकडे संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, “राज्यसभेसाठी शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊ,” हे दाखवते की महाविकास आघाडीच्या एका जागेवर मतभेद असून, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतही पूर्ण एकवाक्यता नाही.राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील या मतभेदांवर पुढील निर्णय कसा घेतला जातो, हे आता लक्षात घेण्यासारखे ठरणार आहे.