एआय तंत्रज्ञानामुळे आता वाघ-बिबट्यांचा गावांवर हल्ला थांबणार!

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
मुंबई,
ai-technology-tiger-leopard-attacks : चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्रप्रकल्पात सुरू केलेल्या ‘सीताराम पेठ’ प्रयोगामुळे राज्यभरात वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे. या प्रयोगात AI तंत्रज्ञानाचा वापर करून गावांजवळ ‘आभासी भिंत’ तयार केली आहे. यामध्ये विशेष कॅमेरे लावून हिंस्त्र प्राण्यांची हालचाल लगेच समजते आणि गावात सायरन वाजते, त्यामुळे नागरिक आधीच सावध होतात.
 
 
ai
 
 
 
भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी सांगितले की, AI तंत्रज्ञानाचा विस्तार राज्यभरात केला जाईल, ज्यामुळे मानवी जीवितहानी कमी होईल आणि वन्यप्राणी संरक्षणही योग्य प्रकारे होईल.
 
यासोबतच, मेंढपाळांच्या समस्या देखील चर्चेत आल्या. मेंढपाळांना वनात चराईसाठी जाणे कठीण होते. दरेकरांच्या मागणीवर वनमंत्री यांनी वेगळे चरई क्षेत्र उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. ही योजना केवळ वन्यजीव सुरक्षितता नाही, तर नागरिकांचे संरक्षण आणि पर्यटन क्षेत्रासाठीही फायदेशीर ठरेल.