पुणे,
Rohit Pawar अजित पवारांच्या दुर्दैवी विमान अपघाताला 28 जानेवारी 2026 रोजी एक महिना पूर्ण होत आहे. बारामती विमानतळाजवळ घडलेल्या या अपघातावरून अनेक प्रश्न आणि संशय उभे राहिले आहेत. या प्रकरणात आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून DGCA आणि VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक भूमिका घेत आहेत.
रोहित पवार यांनी ट्विटरवर स्पष्ट केले की, “अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताला उद्या एक महिना पूर्ण होत असून केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या AAIB चा प्राथमिक अहवाल येईल आणि या अहवालातून सत्य गोष्टी बाहेर येतील, अशी अपेक्षा आहे. येत्या सोमवारी आम्ही आमच्याकडे आलेली नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहोत, त्यामुळे भूतकाळातील इतर घटनांप्रमाणे थातुरमातूर अहवाल देण्याचा प्रयत्न AAIB नक्कीच करणार नाही, ही अपेक्षा!”
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आणि नंतर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा नोंदवण्यासाठी हुज्जत मांडली, पण पोलिसांशी काही वाद झाले. या प्रसंगी अजित पवारांचे बंधू आणि पुतणे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान, भाजप Rohit Pawar आणि काही वकील यांनी रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेवर टीका केली आहे. काहींनी हे स्टंट असल्याचे म्हटले आहे. तरीही रोहित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नवे खुलासे करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.आज ते मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांची भेटीस शिवतीर्थ निवासस्थानी पोहचले आहेत आणि अपघाताच्या मुद्द्यावर चर्चा करणार असल्याचे समजते.राज्यभरातील जनतेचे लक्ष आता उद्या येणार्या AAIB प्राथमिक अहवालावर आणि रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.