उद्यापासून सलग ५ दिवस बँकांना सुट्टी; आरबीआय बँकांच्या सुट्टीची यादी पहा

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,  
rbi-bank-holidays येत्या काही दिवसांत बँकिंगशी संबंधित महत्त्वाची कामे असतील तर ती वेळेत पूर्ण करून घेणे गरजेचे ठरणार आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या शहरातील बँका सुरू आहेत की नाहीत, याची खात्री करून घेणे अधिक योग्य ठरेल. कारण उद्यापासून सलग पाच दिवस विविध ठिकाणी बँकांना सुट्ट्या असणार आहेत. आज, २७ फेब्रुवारीपर्यंत काम आटोपले नाही तर पुढील काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.

rbi-bank-holidays 
 
रिझर्व्ह बँकेनेने जाहीर केलेल्या सुट्टीच्या यादीप्रमाणे होळीच्या सणासोबतच आठवड्याच्या शेवटामुळे देशातील अनेक भागांत बँका बंद राहतील. २८ फेब्रुवारी हा महिन्याचा चौथा शनिवार असल्याने त्या दिवशी देशभरातील बँकांना नियमित सुट्टी असेल. त्यानंतर १ मार्चला रविवार येत असल्याने सलग दुसऱ्या दिवशीही बँकांचे कामकाज ठप्प राहील. मार्चच्या सुरुवातीलाच होळीच्या सणामुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. २ मार्च रोजी होलिका दहनाच्या निमित्ताने लखनौ आणि कानपूर येथील बँका बंद राहतील, तर इतर ठिकाणी व्यवहार सुरू राहतील. rbi-bank-holidays ३ मार्चला धुळवड आणि डोल यात्रेनिमित्त दिल्ली, मुंबई, जयपूर, पाटणा आणि कोलकाता सारख्या प्रमुख शहरांमध्ये बँका बंद असतील. ४ मार्चला होळीच्या मुख्य सणानिमित्त अहमदाबाद, चंदीगड, रांची आणि पुन्हा लखनौसहसह देशातील अनेक शहरांमध्ये पूर्ण सुट्टी असेल.
या सुट्ट्या सर्व राज्यांत एकाच दिवशी लागू होत नसल्याने आपल्या स्थानिक शाखेची सुट्टीची यादी तपासणे आवश्यक आहे. अन्यथा बँकेत जाऊनही काम न होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शाखा बंद असल्या तरी ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नाही. मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग आणि युपीआय यांसारख्या डिजिटल सेवा अखंड सुरू राहतील. rbi-bank-holidays पैशांची देवाणघेवाण, खात्यातील शिल्लक तपासणे किंवा इतर व्यवहार घरबसल्या करता येतील. तसेच एटीएम सुविधा उपलब्ध राहणार असल्याने रोख रकमेबाबतही अडचण निर्माण होणार नाही.