पुणे,
Bawankule calls Ajit Pawar महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान मुलाखतीत भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जवळच्या व्यक्तीला फोन करण्यासाठी सांगितले. बावनकुळे यांनी फोन थेट अजित पवारांना लावला आणि म्हणाले, 'हॅलो आदरणीय अजित दादा, अर्थसंकल्प सादर करायचाय, परत या ना. महाराष्ट्राची जनता तुमची वाट पाहत आहे.
मुलाखतीदरम्यान बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, अजित पवार हे केवळ त्यांच्या पक्षाचे नेते नव्हते, तर राज्यातील सगळ्यांशी काम करत, संवाद साधत राहणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील राजकीय आणि प्रशासनिक कामकाजावर खोल परिणाम झाला आहे. हा अपघात २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना घडला. विमान लँडिंग करताना अपघातग्रस्त झाले आणि ते पूर्णपणे जळून खाक झाले. या अपघातात अजित पवारसह विमानात विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठकही होते.