विद्यापीठाचे दोन वर्षाचे पर्यावरण पुरस्कार जाहीर

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
सांगळूदकर महाविद्यालयाचा समावेश
५ मार्चला वितरण सोहळा
 
अमरावती,
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ‘Environment Award 2024’  ‘पर्यावरण पुरस्कार २०२४’ व ‘पर्यावरण पुरस्कार २०२५’जाहीर झाला असून ५ मार्च रोजी दुपारी ४ वाजता विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृह येथे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते प्रदान होणार आहे. संस्था व व्यक्तिगत अशा दोन गटांमध्ये हा पुरस्कार पर्यावरण संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करणारी संस्था व व्यक्तीला विद्यापीठातर्फे दरवर्षी दिल्या जातो.
 
 
vidks
 
‘Environment Award 2024’ ‘पर्यावरण पुरस्कार २०२४’ करिता यावर्षी संस्था गटात हा पुरस्कार जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय, दर्यापूर, जि. अमरावती या महाविद्यालयाला, तर व्यक्ती गटात नारायणराव नागरे महाविद्यालय, दुसरबिड, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणाचे प्राचार्य डॉ. विजय हिम्मत नागरे यांना जाहीर झाला आहे. ‘पर्यावरण पुरस्कार २०२५’ करिता यावर्षी संस्था गटात हा पुरस्कार मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, विज्ञान व कै. पांडुरंगजी ठाकरे वाणिज्य महाविद्यालय, मानोरा, जि. वाशिम या महाविद्यालयाला, तर व्यक्ती गटात अमरावतीचे माजी सैनिक वसंत माणिकराव पाटील यांना जाहीर झाला आहे.
 
 
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. पर्यावरण पुरस्कार वितरण समारंभाला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, पर्यावरण पुरस्कार निवड समिती २०२४ चे अध्यक्ष डॉ. व्ही. एम. मेटकर व ‘Environment Award 2024’  पर्यावरण पुरस्कार निवड समिती २०२५ चे अध्यक्ष डॉ. आर. एम. कडू यांनी केले आहे.