नागपूर,
वर्धा मार्गावरील बुटीबोरी इंडस्ट्रीयल परिसरात मोठमोठ्या कंपन्यांची संख्या सतत वाढत आहेत. अशा या कंपन्यांना आपले पार्सल अनेक शहरात पाठवावी लागते. अनेक उत्पादने देश-विदेशात सुध्दा पाठवावी लागतात. हीच गरज लक्षात घेता पोस्ट विभागाने बुटीबोरी परिसरात नव्याने पोस्ट ऑफिस सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याशिवाय बुटीबोरी इंडस्ट्रीयल परिसरात Free pickup service फ्री पिकअप सेवा सुरू केल्या जाणार असल्याची माहिती डाक विभागाचे संचालक सुधीर जाखैरे यांनी दिली आहे.
स्वस्त दरात पार्सल पाठविण्याची सुविधा
बुटीबोरी परिसरातील अनेकजण महागड्या कुरियर सेवेचा लाभ घेतात. Free pickup service फ्री पिकअप सेवा सुरू केल्यास पोस्ट विभागाला अधिकाधिक पार्सलची बुकींग मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळेच आता बुटीबोरी परिसरातच पोस्ट ऑफिस सुरू करून पार्सल गोळा केल्या जाणार आहे. पोस्टाच्या या निर्णयामुळे बुटीबोरीतील उद्योजकांना स्वस्त दरात आपले पार्सल पाठविण्याची सुविधा उपलब्ध होणार असून वेळेचीही बचत होणार
फ्री पिकअप सेवा पुरविणार
डाक विभागाचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह असलेले वाहन परिसरात फिरून संबंधित कंपन्यांकडून पार्सलची बुकिंग करून Free pickup service फ्री पिकअप सेवा पुरविणार आहे. बुटीबोरी इंडस्ट्रियल एरियात पोस्ट ऑफिस नसल्यामुळे आतापर्यंत परिसरातील कंपन्यांना खासगी कुरियर कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.