हडस प्रायमरी स्कूलमध्ये वैविध्यपूर्ण मराठी दिन !

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
नागपूर,
Hadas Primary School रामदास पेठ, नागपूर येथील लिबरल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित हडस प्रायमरी स्कूल येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो.कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेला तसेच कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मराठी भाषेप्रती आपले प्रेम व्यक्त केले. वर्ग ६ ची श्रावणी चाटे हिने मराठी दिनाचे औचित्य कथन केले.लहान विद्यार्थ्यांनी निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्या वेशभूषा साकारल्या. वर्ग ९ च्या पद्मेश दायमा, रुद्र पातुरकर, . पार्थवी धुळे व . सानिका टाकळखेडे यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे प्रभावी वाचन व गायन केले.
 
marathi 
 
 
वर्ग ८ व ९ च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘अक्षरशिल्प’ या हस्तलिखिताचे विमोचन यावेळी करण्यात आले. विविध साहित्यप्रकार, शब्दसंपदा, तसेच संत ज्ञानेश्वर व कुसुमाग्रज यांची चित्रे असलेले फलक प्रदर्शित करण्यात आले. वर्ग ५ ची वैष्णवी इटणकर हिने तयार केलेला मराठी शब्दकोश विशेष आकर्षण ठरला.मुख्याध्यापिका मृणाल कासखेडीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मराठी दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. Hadas Primary School ज्येष्ठ मराठी शिक्षिका दर्शना भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिमांशी पराते हिने केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.संपूर्ण कार्यक्रमासाठी दर्शना भालेराव, स्वाती फडके व निधी मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सौजन्य:गजानन रानडे ,संपर्क मित्र