हिंदूंची एकजुट बलशाली भारत घडवेल : गिरीश व्यास

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
पुलगाव, 
Hindu Sammelan हिंदूंच्या संस्कृतीचे पालन न करण्याचा परिणाम भारतात हिंदूंना हिंदू अस्मिता ओळखीचे संकट निर्माण झाले आहे. काँग्रेस सरकारने भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नांना गती दिली होती. त्यामुळे हिंदूंनी संघटित होण्याची गरज आहे. हिंदूंचे बलशाली संघटन हिंदुस्तान घडवेल असे प्रतिपादन प्रखर हिंदुत्ववादी वता व माजी आमदार गिरीश व्यास यांनी केले. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित समर्थ वस्तीच्या विशाल हिंदू सम्मेलनात ते प्रमुख वता म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रंथालय भारतीचे विदर्भ प्रांत संघटन सचिव राजेश राठौड, कीर्तनकार पुनम ठोंबरे, रा. स्व. संघाचे विभाग शारीरिक प्रमुख सचिन मुळे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी डॉ. निलेश गुल्हाने होते.
 
 
hindi dksl
 
गिरीश व्यास यांनी आपल्या हिंदुत्ववादी प्रतिमेनुसार हिंदूंच्या एकजुटी आणि परंपरा पालनावर भर देण्याची गर्जना केली. काँग्रेस राज्यात हिंदूंना नुकसान करणार्‍या विविध कायद्यांबद्दल अवगत करताना वफ बिल कायदा, अल्पसंख्यक आयोगाची स्थापना करून हिंदू मंदिरांच्या मालमत्तेवर सरकारी ताबा घेऊन, हिंदूंचे धन त्यांच्याच विरोधात वापरण्याचे प्रयत्न याबद्दल विस्तृत माहिती दिली. संगठित हिंदू, समर्थ भारत निर्मिती अशा सम्मेलनांचा उद्देश आहे, जो संघाच्या १०० वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने साजरा केला जात आहे म्हणून याला विशाल Hindu Sammelan हिंदू सम्मेलन असे नाव दिले गेले आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राजेश राठौड, कीर्तनकार पुनम ठोंबरे, रा. स्व. संघाचे विभाग शारीरिक प्रमुख सचिन मुळे, डॉ. निलेश गुल्हाने यांनीही मार्गदर्शन केले. संचालन आकाश दुबे यांनी केले. यशस्वीतेकरिता गिरीश चौधरी, अर्पित तिवारी, सुनील अरोरा, अनिल लेकुरवाळे, ज्ञानेश्वर कुंभारे, प्रफुल्ल रावेकर, मंगेश झाडे, शंकर भानारकर, आयुष येंडे इत्यादींनी प्रयत्न केले.