मधमाशांचा हल्ला; जिल्हा परिषदेत खळबळ

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
गोंदिया, 
Madhmashi Attack येथील जिल्हा परिषदेच्या खानावळीत काम करणार्‍या व सजावटी काम करणार्‍या आठदहा कामगारांवर मधमाशांनी हल्ला केल्याचा प्रकार आज 27 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडला.जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचार्‍यांचे क्रीडा सत्र सुरू आहे. आज समारोपाच्या दिवशी दुपारी दीड वाजताच्या सुमारास रात्री आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान खानावळ व सजावटीच्या कामात गुंतलेल्या कामगारांवर अचानक मधमाशांच्या थव्याने हल्ला चढवला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
 
 
madhamashi
 
Madhmashi Attack मिळालेल्या माहितीनुसार, केटरिंगसाठी काम करणार्‍या काही महिला कामगारांसह सजावटीचे साहित्य उभारत असलेल्या अनेक पुरुष कामगारांना मधमाशांनी चावा घेतला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कामगारांमध्ये भीती पसरली आणि काही काळ कार्यक्रमाच्या तयारीतही अडथळा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली. जखमींना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. योग्य वेळी औषधोपचार मिळाल्यामुळे गंभीर प्रकार टळल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परिसराची पाहणी करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.