नागपूर,
Maharashtra National Law University महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरचा चौथा पदवीप्रदान समारंभ शनिवार २८फेब्रुवारीला विद्यापीठ परिसर, वरंगा, वर्धा रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, न्यायमूर्ती अतुल एस. चांदुरकर कार्यक्रमाच्या राहातील. निवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे, निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.
Maharashtra National Law University या समारंभात एकूण २१३ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये १८ पीएच.डी., ५७ एलएल.एम., १०१ बी.ए. एलएल.बी. (ऑनर्स) आणि ३७ बी.ए. एलएल.बी. (ऑनर्स इन अॅडज्युडिकेटिंग अँड जस्टिसिंग) या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शैक्षणिक उत्कृष्टतेच्या विविध अभ्यासक्रमांतील गुणवंत विद्यार्थ्यांना २५ सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत.