मालेगाव,
Malegaon - Mehkar Transport मालेगाव ते मेहकर या रहदारी असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याची या वर्षीच्या अतिवृष्टीने पार वाट लागली आहे. रस्ता ठिकठिकाणी उखडून गेला असल्याने या रस्त्यावरून वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सर्वच प्रकारच्या वाहनासाठी रस्ता धोकादायक झाला आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी दुचाकी धारकांना तर जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. वाहन चालक रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघात झाले आहेत व दररोज घडत आहेत. अनेक वाहनचालक रस्त्याच्या कडेने चांगल्या रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न करतात परंतु सर्वच ठिकाणी छोटे-मोठे खड्डे असल्याने अपघात घडतात या रस्त्यावरील पांगरी कुटे, मुंगळा फाटा, डोंगरकिन्ही, धार पिंपरी, चांडस , कळमगव्हाण, केनवड, कुकसा, पिंपरी सरहद्द या गावातील लोक अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्तीची मागणी करीत आहेत. परंतु अजूनही संबंधित विभागाने याची दखल घेतली नाही.
Malegaon - Mehkar Transport दोन महिन्यापूर्वी ठराविक ठिकाणी रस्त्यांची डागडुजी केली होती. परंतु अल्पावधीतच त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी उंचवटे आहेत व दोन्ही बाजूला रस्ता दबलेला आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तशी मागणी वाहनचालक तसेच या रस्त्यावरील गावातील नागरिक करीत आहेत.