चर्चेला पूर्णविराम! नवीन महापौरांचे 'चर्चेवर कडक' उत्तर

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Mumbai Mayor Ritu Tawde मुंबई महानगरपालिकेवर अनेक दशकांनंतर भाजपचा झेंडा फडकला असून, महापालिका निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर भाजपच्या रितू तावडे यांची मुंबईच्या महापौर म्हणून निवड झाली आहे. मात्र निवडणुकीनंतर रितू तावडे चर्चेत येत आहेत, पण त्यांचे नाव त्यांच्या कामामुळे नव्हे तर सोशल मीडियावर पसरलेल्या एका फोटोमुळे जोरदार चर्चेत आहे.
 

Mumbai Mayor Ritu Tawde Clarifies Viral Watch Controversy 
सध्या व्हायरल झालेल्या त्या फोटोमध्ये रितू तावडे यांच्या मनगटावर असलेले घड्याळ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हा घड्याळ ‘Rolex येलो गोल्ड डेटोना’ असल्याचा दावा केला होता. या मॉडेलची किंमत अंदाजे 60 ते 70 लाखांपासून भारतात 1 कोटींपर्यंत असल्याचेही पोस्टमध्ये नमूद केले गेले होते. या घड्याळामुळे महापौर तावडे यांना ट्रोल करण्यात आले आणि सोशल मीडियावर ती प्रचंड चर्चेचा विषय ठरली.
 
 
 
या चर्चेवर महापौर Mumbai Mayor Ritu Tawde रितू तावडे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. X (माजी Twitter) वर त्यांनी ट्विट करत सांगितले, “ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही. अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे.”रितू तावडे यांच्या या स्पष्ट उत्तरामुळे ट्रोलिंगवर काही प्रमाणात प्रतिक्रिया आली असून, लोकांनी खोटी माहिती पसरविण्याचे धोके आणि अफवा याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू केली आहे. यामध्ये महापौरांच्या प्रतिमेवर होणारा परिणाम आणि सार्वजनिक व्यक्तींवर सोशल मीडियावर होत असलेला दबाव यावरही लक्ष वेधले गेले आहे.मुंबई महापालिका Mumbai Mayor Ritu Tawde निवडणुकीत भाजपचे बहुमत मिळाल्यानंतर रितू तावडे यांच्या कामगिरीवर जनता आणि माध्यमांचे लक्ष असले तरी, सोशल मीडियावरील या घड्याळाच्या प्रकरणामुळे त्यांनी तात्पुरतेच चर्चा गाजवली आहे. आता जनतेची अपेक्षा ही कामगिरी आणि धोरणात्मक निर्णयांवर आहे, सामाजिक माध्यमांवरील अफवांवर नाही.