लोकाभिमुख नगराध्यक्षांच्या जनता दरबारावर पवनीकरांचा विश्वास!

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
200 हून अधिक तक्रारींचा पडला पाऊस
पवनी :
Pavani at Janata Darbar नेतृत्वावर विश्वास असेल, गाऱ्हाणी मांडणारी लोकही पुढे येतात. असाच एक अनुभव पवनीच्या नगराध्यक्षांनी घेतलेल्या जनता दरबाराच्या निमित्याने आला! या जनता दरबारात तक्रारींचा चक्क पाऊस पडला. अवघ्या काही तासात 200 हून अधिक प्राप्त तक्रारींचा निफ्टराही तेवढ्याच तत्परतेने नगराध्यक्षांनी करून लोकांमधून निवडून आलेल्या या पदाला साजेशी कृती केली. काहींना नोटीस, काहींना सूचना तर कुठे कारवाई ही नगराध्यक्षांची कृती पवनीकरांना आपलेसे करून गेली.
 

jjanta darbar 
 
आमदार खासदारांचे जनता दरबार होता. खरंतर मोठ्या लोकांपर्यंत जाताना सामान्य नागरिक जरा दचकतोच! या लोकप्रतिनिधींच्या Pavani at Janata Darbar  जनता दरबाराचा उपक्रम नेहमीच पाहायला मिळतो. परंतु नगराध्यक्षांनी जनता दरबार घेतल्याचे पहिल्यांदाच जिल्हा वासियांनी पाहिले. पवनीच्या नगराध्यक्षा डॉ. विजया नंदुरकर यांचा आज 27 रोजी अवनीच्या नगरपालिका कार्यालयात जनता दरबार झाला. निवडणूक असो की नसो लोकांची तेवढ्याच आस्थेने विचारपूस करणाऱ्या डॉ. नंदुरकर नगराध्यक्ष झाल्याने त्यांच्या अधिकारांचा आणि कार्यक्षेत्राचा विस्तार झाला. प्रत्येक जण आपल्या अडचणी घेऊन लोकप्रतिनिधी पर्यंत येऊ शकत नाही. अशावेळी जनता दरबार हे महत्त्वाचे माध्यम ठरते. त्याचाच अवलंब करीत डॉ. नंदुरकर यांनी हा उपक्रम केला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. तब्बल 200 हून अधिक तक्रारी घेऊन पवनीकर दरबारात दाखल झाले. अतिक्रमण, स्वच्छता, पिण्याचे पाणी, दिवाबत्ती अशा अनेक तक्रारींचा समावेश यात होता. बहुतांश तक्रारींचा निपटारा तेथेच करण्यात आला. अतिक्रमण धारकांना नोटीस देण्याच्या सूचना दिल्या गेल्या. पथदिव्यांची ताबडतोब करण्याचे निर्देश दिले गेले. चुकलेल्या नळाच्या पाईप लाईन किंवा अन्य पिण्याच्या पाण्याच्या तक्रारीचा ताबडतोब करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी दिले गेले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित असल्याने प्रशासकीय यंत्रणाही हाताशी होते.
 
 
अडचण घेऊन आलेल्या प्रत्येकाचे समाधान यावी करण्याचा प्रयत्न झाला. आपले म्हणणे ऐकून घेत, तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान जगत होते. तक्रार केल्यानंतर त्याचे निराकरण होईल असा विश्वास असल्यानेच पवनीकरांनी Pavani at Janata Darbar  जनता दरबाराला उदंड प्रतिसाद दिला. यातून नेतृत्वावरील विश्वास स्पष्ट झळकतो. लोकांमधून निवडून आलेल्या नगराध्यक्षा अशाच लोकाभिमुख राहिल्यास शहराचे चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही.