फागच्या भजनांनी गजबजलेले पुलगाव

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
महाशिवरात्रीपासून सुरू झालेला उत्सव
 
पुलगाव, 
Pulgaon Phag Bhajans पुलगावात होळीचे फाग महाशिवरात्रीपासून रंगपंचमीपर्यंत सुमारे २० ते २५ दिवस सतत चालू राहतात. शहर रात्री फाग भजनांनी गजबजून उठते. फागमध्ये सर्वजण एकत्र येऊन दररोज रात्री फाग गाऊन आपली १३६ वर्षांची परंपरा पाळत आहेत. महाशिवरात्रीला स्टेशन चौक हनुमान मंदिर, शनी मंदिर, श्रीराम मंदिर, जुना पुलगाव हनुमान मंदिर, कठीण माता मंदिरातून शहरातील उत्तर भारतीय कुटुंबे आणि इतर महानुभावांच्या घरी रात्री गात गात शहर गजबजलेले असते. फाग हे एका विशिष्ट रागात गायले जाते. यात राम, कृष्ण, हनुमान, देवीचे भजन दोन ढोलकी, झांज, मंजिरांच्या तालात दोन गट आमनेसामने उभे राहून खड्या आवाजात गाऊन आपल्या आराध्याला आळवणी करतात.
 

bhajan 
 
Pulgaon Phag Bhajans  फाग हे एका विशिष्ट रागामुळे प्राचीन ज्येष्ठांचे तोंडपाठ होते. पण आजच्या युवकांना फागाकडे आकर्षित करण्यासाठी दिवंगत ठाकूर त्रिभुवनसिंह यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांनी स्व अक्षरांनी फागाची डायरी बनवून युवकांना दिली. त्यामुळे युवकांमध्ये उत्साह जागला. नंतर उत्तर भारतीय गटाने ती छापून डायरी बनवली. हळूहळू सोशल मीडियावर हे फाग आले. पण, युवकांना फागाकडे आकर्षित करण्यात दिवंगत ठाकूर त्रिभुवनसिंह यांना आजही त्यांची डायरी वाचून आठवण करून आणली जाते. आज तेव्हापासून जेव्हा हे गाव वसलेलेच नव्हते. इंग्रज काळात रेल्वेचा मोठा पूल वर्धा नदीवर बांधण्यासाठी उत्तर भारतीय लोकांचा गट इथे आला. जो रेल्वेजवळ जिथे आज जुना पुलगाव आहे तिथे वास्तव्य करून दिवसभर पुलाच्या कामात रात्रंदिवस जवळच हनुमान मंदिराची स्थापना करून रात्री भजन गाऊन दिवसभराचा थकवा काढायचे फाल्गुन महिना या उत्तर भारतीयांसाठी उत्साहपूर्ण राहत असे. जो रात्री ढोल, झांज सोबत फाग गाऊन उत्साहाने साजरा करत असत. पुलगावचे रहिवासी इथेच राहिले आणि सर्व धार्मिक कार्य उत्साहाने साजरे करू लागले, त्यापैकी आज अनेक महानुभाव दिवंगत झाले. पण, आजही त्यांच्या वंशजांनी ही फाग परंपरा जपली आहे.